चिखली (हॅलो बुलढाणा) न्यायालयाच्या आदेशाने शेतीचा चतुर्सिमा ताबा देण्यासाठी गेलेले पोलीस व महसूल कर्मचारी रिकाम्या हाताने परतले, त्यामुळे त्यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.
बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कोलोरी येथील दोन शेतकऱ्यांच्या वादानंतर निकाल लागेपर्यंत शासनाच्या ताब्यात असलेल्या जमिनीचा चतुर्सिमा ताबा हा लीलावधारकाला देण्यात यावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्त ही देण्यात आला. मात्र घटनास्थळावर पोचल्यानंतर मंडळ अधिकारी झिने यांना दोन गट क्रमांक मध्ये संभ्रम निर्माण झाला, शिवाय याच प्रकरणातील एका महिलेने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे केवळ मंडळ अधिकारी झिने यांच्या गलथान कारभारामुळे कुठलीही कारवाई न करता पोलिसांच्या फौज फाट्यासह महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना नामुष्की ओढवून रिकाम्या हाताने परतावे लागले आहे.