spot_img
spot_img

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांचे आवाहन.. ‘स्वातंत्र्यदिनी ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिरात सहभागी व्हा! – 1000 पेक्षा जास्त पिशव्यांचे होणार रक्त संकलन!

बुलढणा (हॅलो बुलढाणा) राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि देशी-विदेशी लिकर असोसिएशन, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 15 ऑगस्ट रोजी “ऑपरेशन सिंदुर सन्मान” महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सहकार विद्यामंदिर हॉल, बुलढाणा येथे सकाळी 9.30 ते 5 या वेळेत होणार आहे. या रक्तदान शिबिरात बुलढाणा वासियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी केले आहे.

रक्तसंकलनाची जबाबदारी शासकीय रक्तपेढी बुलढाणा, शेगाव, खामगाव, लिलावती रक्तपेढी बुलढाणा, जनकल्याण रक्तपेढी नांदुरा, दत्ताजी भाले रक्तपेढी छत्रपती संभाजीनगर, आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी अकोला या संस्थांकडे असेल.1000 पेक्षा जास्त रक्त पिशव्यांचे रक्त संकलन होण्याची शक्यता असल्याचे नवलकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास जिल्ह्याचे मान्यवर अधिकारी उपस्थित राहणार असून, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व संस्था प्रतिनिधी उपस्थित राहणार असून नागरिकांनी समाजसेवेचा संदेश देत महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. पराग नवलकर यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!