बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुसळधार पावसाने जिल्ह्यातील चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागात 9 व 10 ऑगस्ट रोजी दाणादाण उडवली. त्यामुळे चिखली तालुक्यातील 31 गावांना अति पावसाचा फटका बसला असून, 2764 हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले आहे.या नुकसानामध्ये सोयाबीन,मका आणि भाजीपाल्याचा समावेश आहे.
गेले दोन दिवस सिंदखेड राजा, देऊळगाव राजा व चिखली तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. उभी पीकं आडवी झाली आहेत. तर काही पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.