बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेशोत्सवाला काही दिवस उरले असताना बुलढाणा शहरातील रस्ते पावसामुळे खड्डेमय बनले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना खड्ड्यांतूनच वाट काढत लाडक्या बाप्पाला आणावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवावे,अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.
गणरायाच्या स्वागतासाठी घरगुती व सार्वजनिक मंडळांना वेध लागले आहेत. परंतु काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. मात्र नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे शहरातील आंतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा फटका मूर्ती आणताना गणेश मंडळांना बसणार आहे. चिखली रोड, त्रिशरण चौक, कारंजा चौक, संगम चौक, जांभरूण रोड, धाड नाका आदी अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.
पावसाने उघडीप दिल्यावर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मागणी मंडळांनी केली आहे.