बुलढाणा (हॅलो बुलडाणा) कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचा दरारा पाहता, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एसपी निलेश तांबे जेवढे गुन्हेगारांसाठी कठोर आहेत तेवढे जनतेसाठी भावनिक सुद्धा आहेत.खाकी वर्दीतील माणूस मनाने कठोर असते असे नाही त्यांनाही मन आहे..भावना आहेत.म्हणूनच ते कायदा व सुव्यवस्था राखतात. 9 ऑगस्ट ला महसूल मंत्री बावनकुळे आल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला नाही मात्र
शासकिय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा (बी.एड.) येथील विद्यार्थीनींनी रक्षाबंधन
सणाचे औचीत्य साधून, पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे भेट दिली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी एसपी निलेश तांबे यांनी उपस्थितीत विद्यार्थीनी तथा भावी शिक्षीका यांचे सोबत सुसंवाद साधून, त्यांना बुलढाणा जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या विवीध
लोकोपयोगी, महिला सुरक्षा संबंधीत उपक्रमाची माहिती दिली. सध्या तक्रार नोंदविण्याठी पर्याय उपलब्ध असून
त्यामध्ये पो.स्टे.ला येऊन तक्रार देणे, ऑनलाईन तक्रार नोंदविणे याच बरोबर हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार
नोंदविणे बाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी, नागरीकांसाठी डायल 112, महिलांसाठी- दामिनी पथक,भरोसा सेल, पोलीसकाका पोलीस दिदी, अमानवीय वाहतूक प्रतिबंधक कक्ष, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध
शालेय तक्रार पेटी, युवकांसाठी अंमली पदार्थ सेवन प्रतिबंध मोहिम अशा मोहिमा व उपक्रम जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.या रक्षाबंधन सण सोहळ्याचे वेळी पोनि सुनिल अंबूलकर प्रभारी अधिकारी स्था.गु.शा. बुलढाणा,
प्रा.डॉ. एस.आर. खडसे शासकिय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा, सपोनि. डी. डी. ढोमणे वाचक पो.अ. बुलढाणा, पोहेकॉ. मनिषा जाधव, पोकॉ. आनंद शिंदे, पोकॉ. अमोल अंभोरे-पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा,
शासकिय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कविता मोहिते, भक्ती पवार, अंजली पांडे, साक्षी निर्मळ, योगेश्वर तांभारे, ऋतुजा चव्हाण, नूतन शिंगणे, वैष्णवी डुकरे, आकांशा वाघमारे, वैष्णवी पारस्कर, श्रुती चऱ्हाटे, स्नेहल
मिरगे, चंचल सित्रे, शिवगंगा सोळंके आणि कार्यालयीन स्टाफ हर्षवर्धन इंगळे शासकिय अध्यापक महाविद्यालय, हे उपस्थित होते.