बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलढाण्यातील कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील साधूबाच्या हॉटेलने शुद्ध शाकाहारी जेवणामध्ये एक ब्रँड बनवून ठेवला होता.मात्र ते आता नाहीत परंतु कायस्थ फॅमिली रेस्टॉरंटच्या रूपाने त्याच जेवणाची चव आता बुलढाणेकरांना लाभत आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तूपकर यांनी उद्घाटनाच्या दिवशी आपल्या कार्यकर्त्यांसह अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेतला अन् तृप्तीची ढेकर दिली. बुलढाणा येथे स्थानिक फॅमिली रेस्टॉरंट आहेत.परंतु सात्विक व अस्सल वैदर्भिय जेवणाची चव घ्यायची असेल तर, साधूबा यांची खानावळ प्रसिद्ध होती. आता या खानावळीला राजेंद्र कायस्थ यांनी आधूनिक रूप दिले, जेवणाची चव मात्र पूर्वीच्या ब्रॅण्डेड साधूबा यांच्या हातची आहे.
बुलढाणा येथे स्थानिक फॅमिली रेस्टॉरंट आहेत. परंतु सात्विक व अस्सल वैदर्भिय जेवणाची चव घ्यायची असेल तर, साधूबा यांची खानावळ प्रसिद्ध होती.काळानुसार येथील हॉटेल्स बदलल्या असल्या,तरी आपले मराठमोळेपण टिकवून ठेवण्यासाठी आता या खानावळीला राजेंद्र कायस्थ यांनी आधुनिक रूप दिले, जेवणाची चव मात्र पूर्वीच्या ब्रॅण्डेड साधूबा यांच्या हातची आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या खानावळीत अफलातून प्रकारातील थाळी खाण्यासाठी लोक इथे वेटिंगवर
असल्याचे चित्र दिसते. राजेंद्र कायस्थ यांनी आम्ही साधुबा यांच्या प्रमाणेच महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव जपली असल्याचे सांगितले.तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर उद्घाटनिय कार्यक्रमात जेवणाची चव चाखली असता, त्यांनी देखील साधुबांच्या हातच्या जेवणाची फिलिंग आल्याचे म्हटले आहे. कोणताही अभिनवेश न आणता आपल्या महाराष्ट्रीय खाद्यपरंपरेचा नेटाने पुरस्कार करणारे मोजकी हॉटेल्स आढळतात.
परंतू साधुबांची हॉटेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि नुकतेच बुलढाणेकरांच्या सेवेत अत्याधुनिक पद्धतीने रुजू झालेले हे कायस्थ फॅमिली रेस्टॉरंट मराठमोठ्या पारंपारिक पदार्थाचे माहेरघर ठरत आहे.