spot_img
spot_img

स्वर्गीय भोंडे जलाशयात 75 टक्के जलसाठा! – सव्वा लाख बुलढाणेकरांसह 15 गावांना दिलासा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काल झालेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे स्वर्गीय भोंडे जलाशय 75 टक्के भरल्याने सव्वा लाख शहरातील बुलढाणेकरांसह परिसरातील 15 गावांना दिलासा मिळाला आहे. पिण्याच्या पाण्याचा व धरणाच्या काठावरील गावातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.

शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या येळगाव धरणात पाणीसाठ्याची क्षमता 12.40 दलघमी आहे. पैनगंगा नदीतील पाणी येळगाव धरणात येते.त्यामुळे जळगाव धरणाची पाणी पातळी 75 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे.
दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने जून अखेर बरसण्यास सुरवात केली आहे. आठवड्या भराच्या विश्रांतीनंतर काल जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदीवर बांधण्यात आलेले स्व. भोंडे धरण 75 टक्के भरले आहे. येळगाव धरणातून बुलढाणा शहरासह ग्रामीण भागातील अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी बु., सागवन, कोलवड, देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर,अंत्री तेली, जांभरुणला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होतो.कालच्या जोरदार पावसाने हजेरी लावली आणि येळगाव धरणात 75 टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!