बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.सूर्यास्त झाला तरी त्यांची बैठक सुरू होती. त्यामुळे महसूल विभागाशी संबंधित व पोलीस खात्याच्या 5 ते 6 तालुक्यातील कर्मचाऱ्यांना आज रक्षाबंधन साजरे करता आले नाही. ‘लाडकी बहीण’ अशी टिमकी मिरवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणा पासून वंचित ठेवल्याची चर्चा कर्मचारी वर्गात आता केली जात आहे.
वर्षभरातून एकदा येणारा रक्षाबंधनाचा सण बहिण भावाचे नाते वृद्धांगित करत असते. रक्षाबंधन या सणाला शासकीय सुटी नसते. हा सण साजरा करण्यासाठी विशेषतः कर्मचारी एक-दोन दिवस आधीच सुटीच्या तयारीत असतात.परंतु यंदाचे रक्षाबंधन शनिवारी आले.हा महिन्यातील दुसरा शनिवार आहे. उद्या रविवारी सुट्टीचा दिवस आहे.त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रक्षाबंधन गावाला जाऊन किंवा घरी साजरा करण्याचे नियोजन केले होते.परंतु महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा ठरला.त्यांनी विविध कार्यक्रमाला हजेरी लावली. संध्याकाळपर्यंत त्यांची बैठक चालली.त्यामुळे अधिकारी व कर्मचारी हे आज रक्षाबंधन साजरे करू शकले नाही.पोलीस विभाग व महसूल यंत्रणेतील महिला कर्मचारी अर्थात लाडक्या बहिणी रक्षाबंधन सणापासून वंचित राहिल्याची चर्चा ऐकायला मिळाली.