देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) सीआरपीएफ चे जवान अमोल रामदास खार्डे 7 ऑगस्ट रोजी अमेठी उत्तर प्रदेश या ठिकाणी दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील आळंदी येथील ते मूळ रहीवासी आहेत.आज त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.
देशासाठी बलिदान देणाऱ्या या भारताच्या वीरपुत्राचा सुस्वभाव होता, असे आळंद गावकरी अभिमानाने सांगतात. सीआरपीएफ मध्ये कर्तव्य बजावणारे अमोल रामदास खार्डे यांना मात्र दुर्दैवाने अमेठी उत्तर प्रदेश या ठिकाणी वीरमरण आले आहे.