spot_img
spot_img

गजर किर्तनाचा… सन्मान किर्तनकारांचा! – केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 10 ऑगस्टला होणार किर्तनकारांचा गौरव!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या किर्तनकारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातुन गजर किर्तनाचा सन्मान किर्तनकाराचा हा गौरव सन्मान सोहळा 10 ऑगस्टला मेहकर येथे प्रा. डॉ.सचिनभाऊ जाधव यांच्या मित्र परिवाराने आयोजीत करण्यात आला आहे. गजर किर्तनाचा सन्मान किर्तनकाराचा या गौरव सोहळयामध्ये जिल्हयातील किर्तनकारांचा सन्मान केल्या जाणार आहे.

अर्भकाचे साटी,पंते हाती धरिली पाटी… तैसे संत जगी,क्रिया करुनि दाविती अंगी…बालकाचे चाली,माता जाणुनी पाऊल घाली…तुका म्हणे नाव,जनासाठी उदकी ठाव…लोकांच्या कल्याणासाठी संत नेहमी चांगल्या वागणुकीचा उपदेश करीत असतात.हा उपदेश करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःच्या चरित्र्यानं प्राप्त केला. ज्ञानदेव तुकाराम महाराज प्रणित भागवत धर्माचा संदेश वारकरी संप्रदाय संदेश किर्तनकार यांच्या माध्यमातुन तळागळातील लोकांपर्यंत पोचविण्याचे आणि समाजप्रबोधन करण्याचे महत्वपुर्ण काम किर्तनकाराच्या माध्यमातुन समाजामध्ये केल्या जात आहे. समाजाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या किर्तनकारांचा सन्मान करण्याचे नियोजन प्रा.डॉ.सचिन जाधव यांच्या वाढदिवसाचे औचीत्त साधुन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे. 10 ऑगस्ट ला मेहकर येथील भुमिपुत्र शेतकरी भवन कॉटन मार्केट येथे सकाळी 10 वाजता गजर किर्तनाचा सन्मान किर्तनकाराचा हा गौरव सोहळा होणार आले. हा सन्मान सोहळा केंद्रिय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या शुभहस्ते आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात जिल्हयातील किर्तनकारांचा सन्मान आगळयावेगळया पध्दतीने केल्या जाणार आहे. किर्तनकाराच्या गौरव सन्मान सोहळयाला नागरीकांनीही उपस्थित रहावे असे आवाहन प्रा.डॉ.सचिनभाऊ जाधव मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!