बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वाहतूक नियम ना पाळणे हे स्वतःचे तसेच इतरांच्या सुद्धा जीवासाठी धोकादायक ठरते.अशीच एक घटना बुलढाणा ते देऊळघाट मार्गावर धाड नाक्याजवळ हॉटेल समाधान समोर आज 8 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली आहे.एका मालवाहू रिक्षा चालकाने अचानक यु टर्न घेतला आणि त्याच वेळी देऊळघाट येथील काही तरुण कारने बुलढाण्याच्या दिशेने जात होते.यावेळी मालवाहू रिक्षाला वाचवण्यासाठी कार अनियंत्रित झाली आणि रोडच्या खाली एका झाडावर आढळून पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणालाही मोठी दुखापत झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे.हा अपघात ज्या मालवाहू रिक्षामुळे झाला त्या रिक्षा चालकाने थोडीही माणुसकी दाखवली नाही आणि तो घटनेनंतर पळून गेला.ही संपूर्ण घटना हॉटेलवर लागलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
- Hellobuldana