बुलढाणा (हॅलो बुलडाणा) एकेकाळी अन्नदात्याची ओळख निर्माण करणारे ‘साधुबा’, आता नव्या जोमात पुन्हा अवतरले! बुलढाण्यातील खवय्यांसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. प्रसिद्ध कायस्थ कॅटर्सने लोकांच्या विशेष आग्रहास्तव ‘जय श्रीराम भोजनालय’ आता ‘कायस्थ फॅमिली रेस्टॉरंट’ या नावाने पुन्हा एकदा सुरू केले आहे.
कारंजा चौकातील शिव शॉपिंग कॉम्प्लेक्समधील या नव्या रेस्टॉरंटचा काल थाटात शुभारंभ झाला. हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात उद्घाटन पार पडले. या रेस्टॉरंटमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणापासून ते उत्तर भारतीय व चायनीज पदार्थांपर्यंत अनेक चविष्ट पर्याय उपलब्ध आहेत.”पोटभर जेवण… मनभर समाधान!” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन, हॉटेलचे संचालक श्री. राजेंद्र देवचंद कायस्थ यांनी ‘हॅलो बुलडाणा’ शी बोलताना स्पष्ट केलं की, दर्जा आणि समाधान यावर आमचा पूर्ण भर आहे. जेवणाचा दर्जा तसाच ठेवत स्व‘साधुबा’ची परंपरा आणि कायस्थ कॅटर्सच्या जेवणाचा दर्जा आम्ही पुढे नेणार आहोत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे स्पेशल व्हेज थाळी, डाळ बाटी, मिरची भाजी, पुरणपोळी, काळा मसाला भाजी, चायनीज डिशेस यांसारख्या खास पदार्थांची मेजवानी!बुलढाण्यात कौटुंबिक जेवणासाठी एक नवा मापदंड निर्माण करणारे ‘कायस्थ रेस्टॉरंट’ हे आता प्रत्येक खवय्याचं आवडतं ठिकाण ठरणार, यात शंका नाही!