बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एसटी कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँकेचे संचालक मंडळच बरखास्त करावे,अशी मागणी राज्यपरिवहन कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीतील 30 जुलै रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आली. ही बैठक बुलडाणा येथील पत्रकार भवनात आयोजीत केली होती.या बैठकीच्या आध्यक्षस्थानी संधटनेचे राज्यध्यक्ष धम्मपाल ताकसांडे होते. त्यांनी संचालक मंडळावर आरोप करीत, कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संयुक्त कृती समितीच्या आंदोलनात कास्ट्राईब राप संघटना सहभागी होणार असल्याचे यावेळी म्हटले.
या बैठकीत राप कर्मचाऱ्यांच्या विवीध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. संघटना कशी वाढेल, राज्य शासनाचे सर्व नियम रापला लागू करण्यात यावे, सातवा वेतन आयोग लागू करावा त्यावरही विचार विनिमय झाला व संघटनेची यावर पूढील दिशा ठरविण्यात आली. मागसवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अन्याय अत्याचारावर व ईतर प्रलंबीत मागण्यांवर सरचिटणीस सुनिल निरभवने, संघटनेचे जेष्ठ नेते पत्रकार विभागीय कार्यध्यक्ष बाबासाहेब जाधव, कोषाध्यक्ष सदाशिव कांबळे, अतिरिक्त सरचिटणीस रविंद्र मांडवे, विधिसल्लागार उदय मालाधरी, उपाध्यक्ष बी.एस. खंडारे, नंदरत्न खंडारे, दादू गोसावी या मान्यावरांनी सखोल मार्गदर्शन केले. या वेळी केंद्रीय कार्यकारणी समोर अध्यक्षीय पदावरून बोलतांना ताकसांडे म्हणाले की, राज्यपरिवहन महामंडळात कर्मचाऱ्यांची एसटी को. ॲाफ बॅंक आहे.त्या बॅंकेत विद्यमान संचालक मंडळ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. गैरमार्गाने नोकर भरती करण्यात येत आहे.खरेदी करताना भ्रष्टाचार होतोय. संचालक मंडळाच्या बैठकीसाठी भरमसाठ खर्च केला जात आहे. स्टार हॉटेल मध्ये बैठका घेतल्या जात आहेत. प्रवास खर्च व इतर भत्ते मिळून संचालकांना हजारो रुपये दिले जात आहे. कामगारांच्या कष्टाच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे मात्र कामगारांना कर्ज वाटप बंद आहे. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे बॅंक बुडविण्यासाठी काम सुरू असलेल्या संचालक मंडळाला बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात ह्या मागणीसाठी मा सहकार आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयावर संयुक्त कृती समितीच्या वतीने 4 जुलै रोजी आयोजित केलेल्या आंदोलनात कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना सहभागी होणार असल्याचे ताकसंडे म्हणाले.