spot_img
spot_img

शिवपुराण कथेतील तिसऱ्या पुष्पात बाल संत दिपशरणजी महाराज म्हणाले… ‘अहंकाराच्या नाशाने ईश्वर प्राप्ती सुलभ होते!’

बुलडाणा (हॅलो बुलढाणा) नारदाला कामावर विजय मिळविल्याचा अहंकार झाला होता आणि मोह नष्ट झाल्याचा अहंकार झाला होता. परंतु नारदाचा मोहनाश करण्यासाठी विष्णुने माया दाखविली व नारदाचा मोहनाश केला म्हणुन अहंकाराचा नाश झाल्या शिवाय ईश्वर प्राप्ती होत नाही. असे प्रतिपादन शिव महापुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी बालसंत दिपशरणजी महाराज यांनी केले. कथेच्या प्रारंभी स‌द्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी दिपशरण महाराजांचे हार घालुन स्वागत केले. यावेळी सौ.अर्चना रविंद्र लध्दड, सौ. अनुसया सुधाकर मानवतकर यांनी व्यासपीठावर शिवपुराण ग्रंथाचे पुजन करून आरती केली. श्रीमती प्रेमलता जैस्वाल, श्रीमती उषा जैस्वाल यांनी महाराजांना शाल व वरत्र भेट दिले. के.एन. कापडे, प्रकाश बदर यांनी माल्यार्पण केले. आजच्या दिवसाचे व्यवस्थापन अग्रवाल समाज महिला मंडळ आणि प्रसाद वितरण सिंधी समाज महिला मंडळ, पंजाबी समाज महिला मंडळ, वर्मा समाज महिला मंडळ, गुजराती समाज महिला मंडळाकडे होत. स‌द्भावना सेवा समिती द्वारा जगदगुरु संत तुकाराम महाराज वारकरी भवन, बुलडाणा येथे दि. ०४ ते १० ऑगस्ट दुपारी २ ते ६ या वेळात भव्य संगितमय शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. कथेचा विस्तार करतांना म्हणाले ईश्वर कधीच कोणाचा विश्वासघात करत नाही. विश्वास करून तर पहा सरळ माणसाला ईश्वर सोपा आहे. “लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जायेगा” या भजनावर श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. भजनाचा रंग लागला हे मराठी भजन श्रोत्यांना खुप आवडले. सांयकाळी आरतीपुर्वी स‌द्भावना सेवा समितीचे सहकोषाध्यक्ष श्री. तिलोकचंदजी चांडक यांचा ७१ वा वाढदिवस समितीचे अध्यक्ष श्रीमान भाईजी यांनी शाल देवून व दिपशरण महाराजांनी गुलाबाचे रोप देवून साजरा केला. दोघांनीही तिलोकचंदजीचे हार घालुन अभिनंदन केले. यावेळी व्यासपीठावर भाईजी, राजेश देशलहरा, चंपालाल शर्मा, सिध्दार्थ शर्मा, मनिष शर्मा, सौ. कुंदा पाटील, विजय शर्मा, माया शर्मा, पुरणमल शर्मा, नितीन जैस्वाल, सुरेश गट्टाणी यांनी आरती केली. सौ. मंदा संतोष तुपकर यांनी रुद्राभिषेक करुन आरती केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!