डोणगाव (हॅलो बुलढाणा) मादणी येथील गजानन बाजीराव बाजड यांच्या मालकीच्या गोठ्याला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून दोन गायींचा होरपळून मृत्यू झाला, तर एक गाय गंभीर जखमी झाली आहे.
मृत गायींपैकी एकीचा रंग तांबडा (वय ५ वर्षे),तर दुसरी लाल-पांढऱ्या रंगाची (वय ३ वर्षे) होती. दोघीही गिर प्रजातीच्या असून, बाजारमूल्य अंदाजे ६०,००० रुपये इतके होते. या आगीत ९० स्प्रिंकलर पाइप, ५०० लिटर पाण्याची टाकी (९५,००० रु.), ज्ञानबा जिजेबा बाजड यांच्या ३० स्प्रिंकलर पाइप (३०,००० रु.) व डिंगाबर जिजेबा बाजड यांच्या ३० स्प्रिंकलर पाइप (३०,००० रु.) असे मिळून एकूण अंदाजे २.५५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तलाठी अनुप नरोटे यांनी घटनेचा
पंचनामा केला आहे.नुकसान भरपाई केव्हा मिळणार? असा प्रश्न पशुपालकाने उपस्थित केला आहे.