बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गेल्या 20 वर्षांच्या कार्यकाळात तुकाराम मुंढे यांची 23 वी बदली आहे. त्यांच्या बदलीमुळे दिव्यांग कल्याण विभागातील खाबुगिरीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.त्यांच्या या बदलीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील बोगस दिव्यांगाचे धाबे दणाणले आहेत.
राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांची असंघटीत कामगार विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून ते आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असतील. प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पंसत नसल्याचे दिसून येते. बुलढाणा जिल्ह्यात अनेक बोगस लाभार्थी लाभ घेत आहेत.मात्र त्यांना ते न्याय मिळवून देतील. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी एक वर्षेच काम करताना दिसून येतात.तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 20 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 23 वी बदली ठरली आहे. दिव्यांग कल्याण विभाग तसा दुर्लक्षित विभाग असल्या च्या शेकडो तक्रारी आहेत. मात्र तुकाराम मुंडे हे या खात्याचे सचिव म्हणून काम करणार आहेत. त्यामुळे आपल्या साध्यासुध्या कामासाठी फेऱ्या मारणाऱ्या दिव्यांग बांधवांची प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.