बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अंगणवाडी सेविकांना वेगवेगळे कामे करावी लागतात.परंतु महिला बाल विकास विभागाने परिपत्रक काढून अंगणवाडी सेविकांची इतर कामांपासून आदेशाने सुटका केली असली तरी, जिल्ह्यात त्यांच्यावर अतिरिक्त काम लादले जात आहे. लाडकी बहिण योजनेचा सर्वे करा..मातृत्व वंदनेचे काम करा..अशी अनेक कामे सुपरवायझर रात्री-बेरात्री फोन करून सांगत असल्याने, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका कर्मचारी युनियन (आयटक) यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन न्याय हक्क मिळवून देण्याची मागणी केली आहे.
आता अंगणवाडी सेविकांना इतर कामे सांगायची असल्यास थेट शासनाची परवानगी आवश्यक आहे.अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांवर जिल्हास्तरावरून विविध प्रकारची कामे लादली जातात.त्यामुळे मुलांना शिकवण्यावर परिणाम होत असताे. मात्र, आता अंगणवाडी सेविकांना अशी अतिरिक्त कामे लादता येणार नाहीत. कामे सांगायची असल्यास त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. महिला बाल विकास विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकात्मिक बाल विकास सेवा व्यतिरिक्त इतर कामे लादू नयेत. लादायची असतील तर शासनाच्या मान्यता गरजेची आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार जिप सिइओंकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडीच्या कामा व्यतिरीक्त इतर विभागाचे कामे सुध्दा दिल्या जातात. त्याबाबत लेखी कोणताही आदेश मिळत नाही. तसेच अंगणवाडीसाठी शासनाचा जि.आर. आहे की, अंगणवाडी कामाव्यतिरीक्त इतर कोणत्याही विभागाचे काम देण्यात येऊ नये. तरी सुध्दा सुपरवाझर यांचे माध्यमातुन जबरदस्तीने काम करुन घेण्याचा प्रयत्न होत आहे.एफ.आर. एस.च्या कामाबाबत सक्त करण्यात येऊ नये. कारण ब-याच ठिकाणी रेंजचा अडथळा असतो. तसेच ४-४ तास एका व्यक्तिचे एफ. आर. एस.
होत नाही. अंगणवाडीचे कामात इतर कामे करुनच एफ.आर.
एस.करण्यात येइल त्यामुळे एफ. आर.एस.ची सक्ती करण्यात येऊ नये तसेच लाडकी बहिण योजनेचा जो सर्वे आहे तो अंगणवाडी सेवीका करणार नाहीत. कारण अंगणवाडीचे वेळेत काम करणे शक्य नाही. त्यामुळे हे काम अंगणवाडी
सेवीका करणार नाहीत आणि
मातृत्व वंदनेचे काम करण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे. त्याची लिंक ही पुर्ण इंग्रजीत आहे व हे अंगणवाडी सेवीकांना शक्य नाही. त्यामुळे हे आम्ही करणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. सुपरवायझरच्या माध्यमातुन अंगणवाडी सेवीकेवर कोणत्याही कामाचा दबाव आणल्या जातो. अंगणवाडीचे व्यतिरीक्त कामाबाबत सुपरवायझर हे रात्री बेरात्री फोन करत असतात व म्हणतात की, हे काम तुम्हाला करावेच लागेल. तसेच काही सुपरवायझर यांनी काही अंगणवाडी सेवीकांच्या पगारात सुध्दा कपात केलेली आहे. त्यामुळे मागील महिन्यात ब-याच
अंगणवाडी सेवीकांचे पगार कमी प्रमाणात आलेले आहे.
बुलडाणा जिल्हयातील सर्व अंगणवाडी सेवीका ह्या दबावाखाली काम करीत असुन त्यांना मानसीक त्रास होत असल्याने जिल्ह्यातील २ अंगणवाडी सेवीका यांना हृदयविकाराचा अटॅक आल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील
दुसरबीड येथील व बुलडाणा तालुक्यतील साखळी येथील अंगणवाडी सेवीका
ह्या मयत झालेल्या आहेत.
करीता अंगणवाडी कामाबाबत योग्य मार्ग काढला नाही तर जिल्ह्यातील
सर्व अंगणवाडी सेवीका, मदतनिस जि.प.बुलडाणा येथे उपोषणास बसतील असा इशारा नियोजन देण्यात आला आहे. दरम्यान या प्रश्नी योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर कॉ.सुरेखा तळेकर,कॉ.शशिकला मौर्या,
कॉ. नंदकिशोर गायकवाड, कॉ. संगीता ठाकुर, अलका राऊत शा.शि. सरकट, शालीनी सरकटे आदींची स्वाक्षरी आहे.