बुलढाणा (हॅलो बुलढाणा) अत्यंत निर्दयीपणे धामणदरी येथील १९ वर्षीय सनी जाधव याचा १ ऑगस्ट रोजी प्रेमसंबंधाच्या वादातून चिखली रोडवरील एका निर्माणाधीन इमारतीत चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील पाचवा आरोपी ऋषिकेश पांढरी गायकवाड (रा. बिरसिंगपूर) याला ५ ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी अटक केली आहे.
सनी जाधव खून प्रकरणात देवराज माळी रा. बुलढाणा याने मित्रांसह मिळून ग्रीन लीफ हॉटेल जवळ सनीवर चाकूने सपासप वार केले होते. त्यामुळे गंभीर जखमी सनीला जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात 6 आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. मात्र, एक आरोपी फरार होता.अखेर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त
माहितीच्या आधारे त्यालाही मंगळवारी अटक केली आहे. दरम्यान गुंडगिरी वाढत असून, वाढत्या गुन्हेगारीला पोलीसांनी चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे.