बुलढाणा (हॅलो बुलढाणा) माजी राज्यमंत्री सुबोध सावजींचे सुपुत्र शैलेश सावजी यांनी उद्योगपती तथा गुजरात येथील वनताराचे संकल्पक अनंत अंबानी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात महादेवी हत्तीणीला
‘वनतारा’ मध्ये नेले.. आता शेतात धुमाकूळ घालणारे वन्यप्राणी घेऊन जावे, अशी मागणी केली आहे.महादेवी माधुरी हत्तीणीला न्यायालयाच्या आदेशाने अंबानी यांनी सांभाळ करण्याकरिता घेतली आहे, याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतात हैदोस घालणारे रानडुक्कर,हरीण, रोही आदी वन्यप्राणी पकडून आपल्या शौकाखातर उभारलेल्या वनतारा अभयारण्यात घेऊन जावे आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शैलेश सुबोध सावजी यांनी एका पत्रात केली आहे.
कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी (माधुरी) हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोपवण्यात आले. यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत ग्रामस्थ भावूक झाले होते. या हत्तीणीला निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली. तसेच महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजु शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील घेण्यात आली. महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात एक लाख 25 हजार 353 लोकांनी स्वाक्षरी केली.या प्रकरणी सर्वत्र पडसाद उमटत आहे.
या संदर्भात वनतारा अभयारण्यात
आता शेतात धुमाकूळ घालणारे वन्यप्राणी घेऊन जावे, अशी मागणी शैलेश सावजी यांनी अंबानी यांना पत्र लिहून केली आहे.
▪️नेमकं प्रकरण काय?
महादेवी हत्तीणीचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायिक पातळीवर पोहोचल्यानंतर चौकशीसाठी समिती नेमण्यात आली.समितीने हत्तीणीची पाहणी करून अहवाल सादर केला होता. यानंतर मुंबई प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य द्यावे लागेल, असे निरीक्षण नोंदवलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी या गावातील नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबतच्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने ही याचीका फेटाळली, त्यामुळे नांदणी मठाची महादेवी हत्तीण वनताराकडे सोपवण्यात आली.