चिखली (हॅलो बुलढाणा) ऐन पावसाळ्यात चिखली तालुक्यातील सावखेड गावात पाणीटंचाईची चटके जाणवत आहेत.गेल्या 6 महिन्यांपासून पाणीपुरवठा खंडित असल्याने पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.शिवाय पाणीपुरवठा योजनेतील वसुलीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकरी करीत आहेत.
सावखेड गावात ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभाराचा गावकऱ्यांना फटका बसत आहे.ग्रामपंचायत ग्रामस्थांना पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा देखील करू शकत नाही.गेल्या 6 महिन्यापासून पाणीपुरवठा खंडित असल्याने पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.