बुलढाणा (हॅलो बुलडाणा) राज्याच्या अधिवेशनात मांडलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील मागासवर्गीय युवकांच्या हिताचे कुठलेही निर्णय घेण्यात आले नाही. सरकार मागासवर्गीय युवकांच्या हिताचे निर्णय केव्हा घेणार? असा परखड सवाल भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी रेटला आहे. शिवाय न्याय न मिळाल्यास या सरकारची व विरोधी पक्षाची तिरडी उचलू असा इशारा देखील दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासुन महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला अध्यक्ष नसुन हे या महामंडळाच्या विविध योजना निधीअभावी कागदावर नाममाञ राहिल्या आहेत. महाविकास आघाडी व भाजप सरकार दोघांचीही धोरणे मागासवर्गीय विरोधी असल्यानेच या महामंडळाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. असा आरोप सतीश पवार यांनी केला आहे.सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला विशेष बाब म्हणुन निधी उपलब्ध करुन द्यावा अन्यथा या सरकारची व विरोधी पक्षाची तिरडी उचलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भीम आर्मीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतिश पवार यांनी दिला आहे.