बुलडाणा (हॅलो बुलडाणा) सद्भावना सेवा समितीद्वरे ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी भवन सर्क्युलर रोड येथे बालसंत श्री. दिपशरणजी महाराज चित्रकुट यांच्या अमृतवाणीतू शिवमहापुराण कथेचे आयोजन केले आहे. कथेची सुरुवात सोमवार दि. ०४ ऑगस्ट सकाळी बारा ज्योर्तीलींगाची पुजा व अभिषेक करुन झाली.
याप्रसंगी सौ. सितादेवी चंपालाल शर्मा, सौ. रेखा प्रकाशचंद्र पाठक, सौ. मनिषा मनिष शर्मा, सुरेशचंद्र गट्टाणी, सौ. आशा तिलोकचंद चांडक, सौ. जमुना पुरणमल शर्मा, सौ. मिना रामनिवास यादव इत्यादींनी रुद्राभिषेक व पुजन केले. चित्रकुट धाम येथील पंडीत विशाल शुक्ला यांनी पौरहीत्य केले. श्री संत गजानन महाराज मंदिर, विष्णुवाडी येथुन शोभायात्रा निघाली अश्वाने सजविलेल्या रथामध्ये बालसंत श्री. दिपशरणजी महाराज विराजमान होते. गजानन महाराज मंदिरात शाल, श्रीफळ देवून दिपशरण महाराजांचे सौ. सिमा कुळकर्णी, अनिकेत व सेवेकरींनी स्वागत केले. भजनी, दिंड्या, ५१ कलशधारी महिला, हातात झेंडे असा मिरवणुकीचा थाट होता. सेवेसाठी आजचा दिवस परशुराम ब्रम्हाण समाज महिला मंडळकडे होता व प्रसाद वाटपाची जबाबदारी जैस्वाल समाज महिला मंडळाकडे होती. या शोभायात्रेत चंपालाल शर्मा, राजेश देशलहारा, सुभाष दर्डा, विजय व्यवहारे, प्रकाशचंद्र पाठक, नितीन जैस्वाल, मधुकर गायके, सुभाष घोरपडे, तिलोकचंद चांडक, मनिष शर्मा, विजय शर्मा, रविंद्र लध्दड, उमेश मुंदडा सुरेश गट्टाणी यांची उपस्थिती होती. ही शोभायात्रा वारकरी भवनमध्ये पोहचल्यावर शिवपुराण कथेला प्रारंभ झाला. कथेच्या प्रारंभी आमदार धिरज लिंगाडे व समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी बालसंत श्री. दिपशरण महाराजांचे माल्यार्पण करुन दिपपुजन केले.