बुलढाणा (हॅलो बुलढाणा) दारूच्या नशेत असताना दुचाकी वरून खाली पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.
प्रभाकर दांडगे वय 40 रा. जळकी बाजार ता. सिल्लोड शुक्रवारी दुपारच्या सुमारास गावातील बस स्टॅन्ड जवळ गाडीवरून खाली पडला.यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयात आणले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. घटनेच्या वेळी मृतक दारूच्या नशेत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.