बुलढाणा (हॅलो बुलडाणा) अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हीडिओ बनवून इन्स्टाग्राम,फेसबुक सह इतर समाज माध्यमावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बुलढाणा येथील आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती संजय देशमुख दोघे रा.बुलडाणा यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हीडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी दोघां विरुध्द आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करत त्यांनी अटक केली आहे. तसेच त्यांची भाईगिरी थांबावी म्हणून पोलिसांनी त्यांच्या माफी मागतांनाचा व्हीडिओ काढला आहे. ज्यात दोन्ही तरुण माफी मागत असून असे व्हीडिओ काढू नका असे आवाहन इतरांना करत आहे.
अलीकडे भाईगिरी ची क्रेझ दिसून येते.छपरी गाण्यांवर हत्यार घेऊन व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केला जातो.बुलढाणा येथील आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती संजय देशमुख दोघे रा.बुलडाणा यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हीडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केला होता. त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणांनी भाईगिरीचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा, इशारा 2 ऑगस्ट रोजी शहर ठाणेदार रवी राठोड यांनी दिला आहे.