बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्राला हादरविणाऱ्या व 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए विशेष न्यायालयाने आज निकाल सुनावला. या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा निकाल बुलढाणा येथील कमलनयन लाहोटी यांचे सुपुत्र तथा न्यायाधीश अभय कमलनयन लाहोटी यांनी दिला आहे.
सन 2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी लागला आहे.सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. बुलढाणा येथील मूळचे रहिवासी असलेले न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल बुलढाणा येथील प्रसिद्ध उद्योजक कमलनयनजी लाहोटी यांचे पुत्र तथा उद्योजक अतुल लाहोटी, अजय लाहोटी यांचे बंधू न्यायाधीश अभय लाहोटी यांनी दिला आहे.