spot_img
spot_img

💥कधी मीठ नसते कधी तेल नसते? चिमुकली म्हणाली..त्यांनी मीठ चोळले.. त्यांच्या वेदनेवर रोहित पवारांची फुंकर! – काय हा विषय?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाण्यातील चिमुकलीने आमदार रोहित पवारांसमोर समस्या मांडल्या व शेतकरी बापाच्या व्यथा सांगितल्या आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.दरम्यान चिमुकली म्हणाली..’कधी मीठ नसते कधी तेल नसते? केवळ मीठ चोळले जाते..या संदर्भात त्यांच्या वेदनेवर रोहित पवारांनी फुंकर घातली आहे.

मी शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याच्या घरात कधी मीठ असते तर तेल नसते,अशी ओरड होत आहे. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा या गावातील शेतकरी दांपत्याने गळफास लावून एकच दिवशी आत्महत्या केली, त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देण्यासाठी आलेल्या आमदार रोहित पवार यांची काही विद्यार्थ्यांनी भेट घेतली, दरम्यान आठव्या वर्गात शिकणाऱ्या सीमा गजानन थुट्टे या चिमुकलीने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा आमदार रोहित पवार यांच्या पुढे पाढाच वाचला.. शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असते तर तेल नसते, तेल असते तर मीठ नसते? सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर जाग येणार का.. असा सवाल देखील या चिमुकलीने यावेळी उपस्थित केला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!