बुलढाणा (हॅलो बुलडाणा) माळेगाव मध्ये अतिक्रमणधारक आदिवासी बांधवांवर झालेल्या कारवाईचा संताप व्यक्त होत असुन, एका अतिक्रमणकर्त्याने रात्री विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. शिवाय त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. भिमसिंग गायकवाड ( वय 45 ) रा. माळेगाव ता. मोताळा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव, माळेगाव येथील वन विभागाच्या जागेत
भिमसिंग गायकवाड हे 30 ते 35 वर्षा पासून राहात आहेत. दरम्यान अतिक्रमीत आदिवासी बांधवांवर वनविभागाने त्यांच्या शेती व घरावर कारवाई करत त्यांचा संसार उद्धवस्त केला आहे. यापूर्वी दीड महिन्या अगोदर देखील वन विभागाने कारवाई केली होती. वनविभागाने 10 ते 15 अतिक्रमण करणाऱ्यांची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने 6 ते 7 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी भिमसिंग गायकवाड यांनी रात्री 9 वाजता विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सकाळी रुग्णालयात हलविण्यात आले होते.तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
▪️घर मोडले, जमीन नाही, पोट कसे भरणार?
गेल्या 30 वर्षापासून माळेगावात राहत असून, वनजमीन पेरून उदरनिर्वाह चालवत आहे. भर पावसाळ्यात गावच मोडले मग राहायचे कुठे? यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला तरी पुन्हा वनविभागाने पैसा खाऊन उघड्यावर आणले. घर मोडले, जमीन नाही, पोट कसे भरणार? त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, याला वनविभाग जवाबदार आहे,
असे भिमसिंग गायकवाड यांनी एका चिठ्ठीत लिहिले आहे.