बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यासह राज्यात वासनांधाचा सुळसुळाट झाला असून महिला अत्याचाराची मालीका सुरूच आहे,अशा गंभीर घटनांना जरब लावण्याची नितांत गरज अधोरेखित होत असून, अशाच एका मुलीच्या विनयभंगाच्या घटने प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलसादायी निर्णय दिला आहे.
तालुक्यातील एका गावात मुलीच्या घरात प्रवेश करून आरोपीने विनयभंग केल्याप्रकरणी त्याला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्हि.देशपांडे यांनी 1 वर्ष सश्रम कारावासाची व 1 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकार महिला अत्याचारा विरोधात कधी आवाज उठवणार? गुन्ह्यांच्या वाढत्या संख्येची जबाबदारी कोण घेणार? राजकीय वरदहस्तामुळे फरार आरोपींची संख्या कधी कमी होणार? गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्या करिता सरकारी यंत्रणा कंबर कसून कधी उभी राहणार? या प्रश्नांच्या उत्तरांकडे तूर्तास महाराष्ट्रातील भगिनी आस लावून बसल्या आहेत.महाराष्ट्राने महिलांवर होणार्या अत्याचारांचा उच्चांक गाठलेला पाहिला. अजाण बालिका, अल्पवयीन मुली, मध्यमवयीन महिला वासनांध विकृतीला बळी जाण्याकरिता कोणत्याही वयाचा अपवाद नाही. ही विकृती केवळ महिलेच्या शरीराचा उपभेाग घेण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. पुढे जाऊन तिचा जीव घेण्यापर्यंत क्रौर्याने थैमान मांडले आहे. अशात बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात 2020 मध्ये विनयभंगाची घटना घडली. घटनेच्या दिवशी मुलगी एकटी घरी होती.आरोपी अजय उर्फ रवि राजू महाले याने तिला घरात घुसून बोलण्यात गुंतवले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला.या प्रकरणी बुलढाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान सोमवारी 28 जुलै रोजी येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. व्हि. देशपांडे यांनी आरोपीला 1 वर्ष सश्रम कारावास व 1 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. संतोष खत्री यांनी जोरदार बाजू मांडली. शेखर थोरात यांनी कोर्ट पैरवीचे कामकाज पाहीले.