बुलढाणा (हॅलो बुलडाणा/प्रशांत खंडारे) साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हे समाजमनात बसलेले भीतिदायक समीकरण आहे. मात्र या भीतीला दूर सारून आजची तरुणाई सर्पमित्र म्हणून काम करताना दिसते आहे.
बुलढाणाचे श्रीराम रसाळ हे सर्पमित्र येथील विदर्भ कोकण बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. रसाळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने वन्यजीव सरंक्षण व निसर्ग पर्यावरण या नावाने संस्था काढून सर्प जनजागृती कार्यक्रम करण्यास सुरुवात केल्यानंतर
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साप पकडण्यासाठी नागरीक, शेतकरी फोन करू लागले. जिल्ह्यात व बाहेर सर्प रक्षणाचे कार्य सुरू झाले. संस्थेच्या माध्यमातून सध्या शंभराहून अधिक सर्पमित्र एकत्र काम करत आहेत. परंतु त्यांना ‘ओळखपत्र देण्याइतकी साधी दखलही शासन घेत नाही. साप पकडतांना दंशाने त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ कधी होईल, याची कुठलीच शाश्वती नाही. आज नागपंचमी.. नाग पूजनाचा दिवस परंतु सर्पमित्राच्या नशीबी असलेले शुक्लकाष्ठ संपून त्यांचा सन्मानाचा दिवस कधी उजाडणार, याकडे तमाम सर्पमित्रांचे लक्ष लागून आहे.
एस.बी. रसाळ सांगतात की, सर्व
प्रथम इयत्ता पाचवीत असतांना मी कुतूहलापोटी नदीतली धामण पकडली होती. कालातंराने प्रबोधनाची शेतकरी वर्गाला खरी गरज सापाविषयी आहे, हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हापासून मी सापांसाठी काम करू लागलो. सर्पतज्ञ पठाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेऊन सर्पमित्र क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
लहाणपणापासून एस.बी. रसाळ यांना गावाकडे साप दिसला की एकीकडे नमस्कार केला जातो तर दुसरीकडे त्याला मारूनही टाकलं जातं. कुठेतरी हे चित्र बदलायला हवं म्हणून रसाळ या क्षेत्राकडे वळले. विद्यार्थीदशेपासूनच त्यांची या विषयी गाडी सुसाट सुटली. मोबाइल हातात आल्याने साप आला की त्यांचा फोन खणखणायचा व रसाळ
नोकरी सांभाळून साप पकडायला रवाना व्हायचे. सध्या ते ‘सर्प संवर्धन, संरक्षण आणि सापाबद्दलची भीती आणि अंधश्रद्धा अशी
विज्ञान कार्यशाळा घेत असतात. यातून सापाविषयी गैरसमज दूर करतात. मुक्या प्राण्याची ती धडपड, सरपटत दगडे चुकवणे हे आजही आठवल की माझा असाचं कंठ दाटून येतो. साप दिसला की लोक त्याच्या जीवावरचं उठतात. त्यांनाही जीव असतो. संवेदना असतात. ते या निसर्गाच्या चक्रातील एक महत्वाचा घटक आहेत. त्यांना मारणार्यांचा आणि वाचवणार्यांचा स्पर्श कळतो. ते वाचवणार्याला कधीही दंश करत नाहीत.मुक्या प्राण्याची ती धडपड, सरपटत दगडे चुकवणे.. हे आजही आठवल की अनेकांचा कंठ दाटून येतो. साप दिसला की लोक त्याच्या जीवावरचं उठतात. त्यांनाही जीव असतो. संवेदना असतात. ते या निसर्गाच्या चक्रातील एक महत्वाचा घटक आहे.
▪️24 तासात सापांचे जंगलात पूर्नवसन आवश्यक!
मानवी वस्त्यांमधून साप पकडल्यानंतर 24 तासात पकडलेल्या सापांचे जंगलात पूर्नवसन करणे कायद्याने बंधनकारक आहे. तो नियम मी कटाक्षाने पाळतो. आजपर्यंत मी हजारो साप पकडले आहेत. त्याची नोंद मीे ठेवली आहे. साप पकडने हे काम अतिशय जिकरीचे असते. सापाच्या अनेक विषारी, निमविषारी व बिनविषारी जाती आढळतात. कोणताही साप चावला तरी त्यावर ईलाज घेतालाच पाहिजे. जरी बिनविषारी साप चावला तरी तो जे उंदीर, बेडूक व इतर खाद्य खात असतो, त्यामुळे त्याच्या तोंडात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. या बॅक्टेरियामुळे ईन्फेक्शन होऊ शकते. ते टाळण्यासाठी डॉक्टरी ईलाज घेतलाचं पाहिजे. असे रसाळ सर आवर्जून सांगतात. या कामासाठी त्यांना सरकारकडून काही मदत मिळत नाही.
▪️काय आहेत मागण्या?
साप पकडल्यास त्यांना काही वेळ ठेवण्यात जागा उपलब्ध करून देणे हे अती महत्त्वाचे आहे. सर्पमित्र यांची दरमहा मिटींग घेणे गरजेचे असुन वन्यजिव कायद्यानुसार मार्गदर्शन करणे अती गरजेचे आहे. साप सोडण्यासाठी वाहन देणे व सर्पमित्र यांना रेस्क्यू टीममध्ये समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे.शिवाय ओळखपत्र देण्याची गरज आहे.