बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव येथे रोहन पैठणकर या दलित तरुणाला तीन जणांनी मारहाण केल्याने त्याचा निषेध वंचित बहुजन आघाडी कडून खामगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.त्या आव्हानाला प्रतिसाद देत शहरातील व्यापारी व शहरवासीयांनी प्रतिसाद देत आपली प्रतिष्ठाने वैद्यकीय सेवा वगळता बंद ठेवण्यात आली आहे.
रोहन पैठणकर (वय २१ ) यास जातीयवादी समाजकंटकांनी चौकातून उचलून नेऊन अपहरण केले व त्यास खामगावच्या काँग्रेस मैदानावर अमानुष मारहाण केली व त्याचा धर्म विचारून त्याला विवस्त्र करत अमानुषपणे मारहाण केली. त्याचेवर गाय चोरीचा खोटा आड घेतला त्याचे मारहाणीचे आरोपींनी व्हिडिओ काढून स्वतःच प्रसारण केले ही बाब सबंध महाराष्ट्रा च्या पुरोगामीत्वाला कलंकित करणारी आहे.सदर अमानवीय घटनेचा जाहीर निषेध करित सदर घटनेच्या निषेधार्थ आज खामगाव बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान आज खामगावातील व्यापारी व शहरवासीयांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत.