बुलढाणा (हॅलो बुलडाणा) श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील हेमाडपंती शिवमंदिरांत आज भाविकांची गर्दी फुलली व शिवांचा गजर होतेय.
पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आज गर्दी केली होती. बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शिवकालीन हेमाडपंती महादेव मंदिर दूरवर परिचित आहे. या मंदिराचा सन 1962 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला आहे. हे मंदिर पैनगंगा आणि वखारी नदीच्या तीरावर वसलेले आहे. या शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने तीन दिवस मोठी यात्रा भरत असते. श्रावण महिन्यात दर सोमवारी भक्तांची दर्शनासाठी मोठी रीघ लागते. आज तर महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचे दिसुन येत आहे. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शिवमंदिरात बम बम भोलेचा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतले.येथे अनेकांनी विविध दुकाने थाटून पहिल्या श्रावण सोमवारी यात्रेचे स्वरूप दिले आहे.