लोणार (हॅलो बुलडाणा/ राहुल सरदार) एक चिमूकला पाण्यात बुडत असल्याचे गस्तीवरून परतणाऱ्या पोलिसांना दिसले अन् त्यांनी क्षर्णाधात डोहात उडी घेऊन, पाण्याच्या प्रवाहात तो चिमुकला खोलवर जात असताना, पोलिसांनी त्वरित या मुलाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचवले.या घटनेमुळे, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कार्याचे कौतुक केले आहे.
लोणार शहराबाहेरील घरकुल परिसरात लोणार पोलीस स्टेशनचे बिट जमादार संतोष चव्हाण व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे पेट्रोलिंग साठी घरकुल परिसरात गेले होते, त्या ठिकाणा वरून पेट्रोलिंग करून परत येत असतांना त्यांना एका डोहा जवळ चिमूकला ओरडत उभा असल्याचे दिसून आले. त्यांची नजर डोहा जवळ गेली तर एक चिमुकला पाण्यात बुडतातांना निदर्शनास आला. क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी पाण्यात उडी घेऊन त्या बालकाला पाण्यातून बाहेर काढले व त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.या घटनेवरून असे समजते की, ‘देव तारी त्याला कोण मारी!’ खरच पोलीस बिट जमादार संतोष चव्हाण व अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे त्या मुलाच्या साठी देवदूत ठरले आहेत, अशी भावनात्मक प्रतिक्रिया आता उमटत आहे.
▪️ मागणीकडे लक्ष द्या!
घरकुल परिसरातील हा पाण्याच्या डोह खूप धोकादायक आहे.भविष्यात अशी घटना परत घडू नये, या साठी प्रशासनाने उपाययोजना करावी अशी मागणी घरकुल वासी करीत आहेत.
▪️पोलीस निरीक्षक निमिष मेहत्रे म्हणतात..
‘या डोहात फार मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी सतर्कता ठेवावी व आपल्या चिमूकल्याकडे लक्ष ठेवावे!’