चिखली (हॅलो बुलडाणा / सय्यद साहिल) चिखली शहरात आज दुपारी एक खळबळजनक घटना समोर आली. गजानन नगरमधील रामेश्वर मधुकर खरात (वय 40) या व्यक्तीने नॅजारीण चर्चच्या पाठीमागील निंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली.
प्राथमिक अंदाजानुसार, ही आत्महत्या काल रात्रीच झाल्याची शक्यता आहे. मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तातडीने पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी जिल्हा उप रुग्णालयात पाठवले आहे.ह्या आत्महत्ये मागली कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही
पुढील तपास चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय हुसे व पोलीस शिपाई रोहिदास पंढरे करत आहेत.