बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आमदार क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर पाचशे एकर जमीन असल्याचा आरोप केला तर शेट्टी यांनी पाचशे एकर जमिनीचे सातबारा द्यावे, ती जमीन क्षीरसागर यांच्या नावावर बक्षीसपत्र करून देण्याचे प्रतिउत्तर दिले.दरम्यान रविकांत तुपकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अनेक राजकारणी नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांच्या नावावर प्रॉपर्टी करीत असतात.
राजकारणी मुरब्बी झाले.राजकारण्यांची पूर्वीची संपत्ती आणि आजची संपत्ती याचे दर पाच वर्षांनी जरी मूल्यमापन केले तर सर्व समोर येते.पब्लिक सब कुछ जानती है! अशा शब्दात तूपकरांनी मत व्यक्त केले. ते हॅलो बुलढाणा व सीटी न्यूज चॅनलच्या कार्यालयात आले असता त्यांनी चर्चा करून अनेक मुद्द्यांना हात घातला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत यावेळी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, क्रांतिकारी शेतकरी संघटना केवळ शेतकऱ्यांच्या समस्येसाठी लढत नाही तर जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी देखील लढते.शहरातील तेलगु नगरातील रस्त्यावर खड्डे पडले होते. हा प्रश्न नगरपालिका मध्ये रेटून रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले.शहरातही आमची कामे आहेत. लोकसभा निवडणूकीत शहरातून मला साडेपाच हजार मते मिळाली. पुढे कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणार आणि निवडणूक संदर्भातील भूमिका घेतल्या जाईल,असे तूपकर म्हणाले.यावेळी त्यांनी हुमणी अळीचा हल्ला, कर्जमाफी व पिकविमा संदर्भातील सरकारच्या उदासिन धोरणावर ही भाष्य केले.