बुलढाणा (हॅलो बुलढाणा) खामगाव तालुक्यातील निपाणा गावातील मुख्यमार्गावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.घाणीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार मागणी करूनही गावातील सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घाणीच्या साम्राज्यामुळे
शाळकरी मुलं तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
या घाणीच्या दूषित पाण्यामुळे घरोघरी लहान मुलं लोक आजारी पडत आहेत. गाव हे 100% हागणदारी मुक्त गाव असून लोक याच मुख्य महामार्गावर शौच करून जातात. त्यामुळे विविध आजार पसरत आहेत.
शासनाने स्वच्छ भारत मिशन यासारख्या विविध योजनांची अंमलबजावणी केली असून सुद्धा या योजनेचे फलित काही दिसून येत नाही. ग्रामपंचायत याकडे दुर्लक्षित असून, समस्या निकाली न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.