खामगाव (हॅलो बुलढाणा) सध्या जिल्ह्यात वाळू तस्करी छुप्या मार्गाने व लोकेशन देऊन केली जात आहे.दिवसा म्हणा की रात्री अवैध वाळू उपसा व वाहतुकीचा खेळ चालू असुन, जबाबदार यंत्रणेचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे.अशाच खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांनी त्यांच्या निवासस्थाना समोरील वाळू माफिया मालकाला खबर देताना एका खबऱ्याला ताब्यात घेतले आहे.आकाश किशोर वाबळे असे या आरोपीचे नाव आहे.
खामगावात अवैध वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात असून, वाळू घाटांचा लिलाव झाले नसताना राजरोसपणे वाळू उपसा व वाहतूक होत आहे.हा प्रकार लोकेशनवर चालतो. वाळू तस्करांनी अनेक खबरी ठेवले आहेत.
शिवाय काही वाळू तस्कर अधिकाऱ्यांना हप्ता देखील देतात. असाच एक खबरी आकाश किशोर वाबळे तहसीलदार सुनील पाटील यांचे शासकीय निवासनासमोर रेकी करीत असताना, गजाआड झाला आहे. तो मालक नावाच्या व रेती संघटनाच्या व्हाट्सअप ग्रुपवर तहसीलदार व पोलीस यांचे लोकेशन देत होता. याची पुरावे सापडले असून, या आरोपी विरोधात शासकीय कामात अडथळा,चोरी करण्यास मदत,संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा,माहिती तंत्रज्ञान कायदा, बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.
▪️तस्करी करणारे ठेकेदार कोण?
वाळू तस्करीत अनेकांचे हात काळे आहेत. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत काही ठेकेदारांची नावे देण्यात आली आहेत.यामध्ये आरोपी वाबळे च्या मोबाईल मध्ये ठेकेदाराचे नावे आढळून आलेत. किरण ठाकूर,शेख आसिफ,सागर वनारे, गोपाल गोंड,गणेश बिचारे, अभिषेक गावंडे, गौरव दाणे, विकास शेगावे असे बड्या ठेकेदाराचा तक्रारीत समावेश आहे.