बुलढाणा (हॅलो बुलडाणा) लाचखोरी प्रकरणात सहसा पहिल्याच दिवशी जामीन मंजूर होत नाही.एसीबीकडून आरोपीविरुद्ध पीसीआरची मागणी केली जाते.परंतू ॲड.शर्वरी तुपकर व ॲड.अजय दिनोदे यांच्या जोरदार युक्तीवादामुळे
लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे व दूसरा आरोपी देवानंद खंडाळे याचा गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
धाड परिक्षेत्रातील एका शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव केंद्रावर विक्री केलेल्या ज्वारीचे बिल अदा करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून,जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे याच्याकडून 70 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.तोडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते.त्यातील 25 हजार रुपये लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पुरवठा अधिकारी टेकाळे व पुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेला खाजगी इसम देवानंद खंडाळे हे 2 आरोपी अँटी करप्शन ब्यूरोच्या जाळ्यात अडकले होते. सदर लाच प्रकरणीचा व्यवहार हा खंडाळे याने केला होता.त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुरुवारी 24 जुलैला दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते.एसीबीने 2 दिवसांच्या पीसीआरची मागणी केली होती.मात्र ॲड.शर्वरी तुपकर यांनी जोरदार अर्ग्यूमेण्ट केले. ॲड.तूपकर यांच्या
अर्ग्यूमेण्टमुळे एसीबीने केलेल्या 2 दिवसाच्या पीसीआरची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर ॲड. तूपकर यांनी आरोपी टेकाळे यांना बेल मिळण्याचा अर्ज सादर केला.मात्र एसीबीने तो रद्द करण्याची पुन्हा मागणी केली होती.परंतु जोरदार युक्तिवाद ग्राह्य धरत गुरुवारी टेकाळे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.याच प्रकरणातील दुसरा आरोपी देवानंद खंडाळे याची जामीन ॲड.अजय दिनोदे यांच्या युक्तिवादामुळे झाली आहे, हे विशेष! पुरावे नसल्याने न्यायाधीश श्रीमती एम.व्ही. देशपांडे यांनी दोन्ही आरोपींना बेल मंजूर केली आहे.