बुलढाणा (हॅलो बुलडाणा) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांजवळून पिक विमा बद्दल प्रत्येकी एक एक रुपया घेते,कारण महाराष्ट्र शासन भिकारी आहे,असे वक्तव्य केले होते. हा तमाम शेतकऱ्यांचा अपमान आहे. शिवाय विविध योजना रेंगाळल्या असून,’खरंच महाराष्ट्र शासन भिकारी झाल्यासारखे वाटत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे,अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
कृषिमंत्री कोकाटे यांनी म्हटले होते की,शेतकऱ्यां जवळून महाराष्ट्र शासन पीक विम्याचे एक एक रुपया घेते, कारण महाराष्ट्र शासन भिकारी आहे, हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा घोर अपमान आहे.याबद्दल आपले मत काय? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
सावजी म्हणाले की, महाराष्ट्र शासन भिकारी आहे हे कोकाटे यांचे म्हणणे अतिशय खरे आहे असे वाटायला लागते. कारण राज्यात सर्व कास्तकारांना पीक विम्याचे पैसे दिल्या गेले नाहीत.निवडणुकीच्या काळात लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेत व २१०० रुपये देऊ असे, असताना याच पंधराशेतून अनेक लाडक्या बहिणी वंचित ठेवल्या. कारण शासना जवळ पैसा नाही. राज्यामध्ये सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करू अशी घोषणा करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. अतिवृष्टी होऊनही कास्तकराला व पुरामुळे घराच्या पडझड झालेल्या रहिवाशांना कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही तसेच घरकुलाचे अनुदान पूर्णपणे वाटप झाले नाही. घरकुले अर्धेच राहिलेले आहेत. अशा अनेक योजना सुरू होऊन अर्धवट आहे.त्या पूर्ण करण्याकरता पैसा नाही
हे सर्व पाहता शासन भिकारी आहे,असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले हे खरे वाटू लागले आहे. कृषीमंत्री कोकाटे यांनी शासनाबद्दल जे म्हटले याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित खुलासा करावा अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.