spot_img
spot_img

पिंप्रीची वाट बिकट! – साबांविचे दुर्लक्ष, स्मशानभूमीत पार्थिव नेता येत नाही मुलांनी शाळेत जायचे कसे?

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/ संतोष जाधव) तालुक्यातील पिंप्री आंधळे गावातला मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असून या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने सततच्या पावसामुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.या रस्त्याचे तातडीने खडीकरण करून देण्याची मागणी पिंप्री आंधळेच्या सरपंच सौ.अंजली आंधळे व ग्रामस्थांनी संबधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सचिन वाघ, शाखा अभियंता महेश भाले यांना दिलेल्या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत अंढेरा ते डोड्रा हा रस्ता असून सदर रस्ता हा पिंप्री आंधळे गावातून मुख्य मार्गाने गेलेला आहे.या रस्त्याच्या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गावाच्या वतीने सरपंच यांनी वारंवार सूचित केलेले होते.मात्र त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.सदर रस्ता हा गावातल्या मुख्य मार्गाने गेलेला असल्याने या रस्त्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.या मार्गावर देवी देवतांचे मंदिर असून सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये हरिपाठ, भजन व आरती करण्यासाठी ग्रामस्थांना जाणे शक्य नाही,या संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने वयोवृद्धांना पाय घसरून गंभीर दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.याच मुख्य मार्गावर गावातली हिंदू स्मशानभूमी असून रस्ता अतिशय खराब झालेला असल्याने अंत्यसंस्कारासाठी पार्थिव सुद्धा नेणे मुश्किल झाले आहे.अंत्यविधी व रक्षा विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांना या रस्त्याने स्मशानभूमीत जाणे शक्य नाही, गावात येणारा रस्ता हा अत्यंत खराब असल्याने गावातील अंगणवाडीत प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुला मुलींना या रस्त्याने जाणे बंद झाले आहे.तसेच बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या मुला-मुलींना नेण्यासाठी येणाऱ्या स्कूल बसेस या गावाच्या बाहेरच थांबत असल्याने दररोज पालक त्यांच्या मुलांना घेऊन या स्कूल बसेस पर्यंत सोडतात.सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने या रस्त्यावर ग्रामपंचायतला काम करता येत नाही,अंढेरा फाटा ते डोड्रा हा रस्ता मंजूर झालेला नाही, तो पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयापासून ते मल्हारी आंधळे यांच्या घराच्या जवळच्या डोड्रा पांधीच्या कॉर्नर पर्यंत तातडीने या रस्त्याचे खडीकरण करून देण्याची मागणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.पिंप्री आंधळेच्या सरपंच सौ.अंजली आंधळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. यावेळी सरपंच अंजली आंधळे,व्हाईस ऑफ मिडिया पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अर्जुनकुमार आंधळे,विकास राजेंद्र आंधळे,विष्णु शिवाजी परिहार,किरण रविंद्र आंधळे, वैभव पंढरी आंधळे,निलेश विष्णु वाघ उपस्थित होते.

▪️ग्रामपंचायतला टार्गेट करणे हे चुकीचंच!

सदर रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून या संदर्भातील रस्त्याची मागणी एप्रिल २०२२ मध्ये तत्कालीन माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचेकडे मी केलेली होती.मंत्री महोदयांनी इसरुळ,डोड्रा,पिंप्री आंधळे, अंढेरा, बांगर घाटी, मेरा, साखरखेर्डा, देऊळगाव माळी असा सात कोटी रुपयांचा रस्ता त्यावेळी मंजुरातीसाठी टाकला होता. मात्र त्याचवेळी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्याने तो विषय तिथेच थांबला. सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे, हे विरोधकांनी अगोदर समजून घेण्याची गरज आहे.विनाकारण ग्रामपंचायतला टार्गेट करून नागरिकांची दिशाभूल करू नये.या रस्त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे आमचा पाठपुरावा सुरूच आहे.
सौ.अंजली आंधळे (सरपंच)

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!