बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शेतकऱ्याने शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली होती.विक्री केलेल्या ज्वारीचे बिल काढून देण्यासाठी आणि कोणतीही अडचण पुढे येऊ नये म्हणून शेतकऱ्याला तब्बल 70 हजार रुपयांची लाच मागून पहिला हप्ता 25 हजार रुपये घेतांना पुरवठा अधिकारी व एक खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात रंगेहात सापडलाय.घटना आज येथील मुठ्ठे लेआउट व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे घडली.जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील कार्यरत वर्ग दोन चा गजानन नंदकिशोर टेकाळे पुरवठा अधिकारी रा.खडकपुरा, चिखली व सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक खाजगी इसम देवानंद गंगाराम खंडाळे रा.तानाजी नगर बुलढाणा असे या लाचखोराचे नाव आहे.
शासनाचा गलेलठ्ठ पगार असूनही, सरकारी बाबू, अधिकारी यांना वर कमाईची प्रचंड हौस असल्याचे मागील विविध घटनांवरून दिसून येत आहे.गरिबांचे रक्तशोषण करून एवढा खादाडपणा कशाला? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे. आजही दोन खादाडांना एसीबीच्या पथकाने जेरबंद केले आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील कार्यरत वर्ग दोन चा गजानन नंदकिशोर टेकाळे पुरवठा अधिकारी रा.खडकपुरा, चिखली व सेवानिवृत्त जिल्हा लेखा पर्यवेक्षक खाजगी इसम देवानंद गंगाराम खंडाळे रा.तानाजी नगर बुलढाणा या दोन लाचखोरांनी एका शेतकऱ्याला लाच मागितली. शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली होती.विक्री केलेल्या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण येऊ नये आणि भविष्यात ज्वारी विक्री सुरळीत होईल म्हणून, आरोपींकडून शेतकऱ्याला 70 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी 21 ते 23 जुलै पर्यंत एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता आरोपी टेकाळे व खंडाळे यांचा लुचाटपणा समोर आला. आरोपी विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.