बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जळगाव जामोद चे भाजपा आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले कारचालक पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केलं. मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी लावून धरली.दरम्यान त्यांनी संचितांची नावे समोर आणली आहेत.
आज 22 जुलै रोजी सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयतांची नावे व या प्रकरणात संशयीतांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे पोलीस अधीक्षकांकडे दिली आहे. आज सुनीता देशमुख यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोरही पंकज देशमुख यांची हत्या करणाऱ्या संशयीतांची नावे व त्यांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावे उघड केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस विभागही अडचणीत आला आहे.आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल.आमदार संजय कुटे यांचा कारचालक व निकटवर्ती असलेल्या पंकज देशमुख यांच्या घातपातात सुनीता देशमुख यांनी आज पोलीस अधीक्षकांना दिलेली संशयीतांची नावे धक्कादायक आहे.
▪️अशी आहेत संशयीतांची नावे!
1 – निलेश शर्मा ( आ. संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक व अतिशय निकटवर्ती.)
2 – गजानन सरोदे ( आ. संजय कुटे यांचे निकटवर्तीय नातेवाईक.)
3 – परीक्षित ठाकरे ( कंत्राटदार )
4 – श्रीकांत निचळ ( पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद)
5 – अमोल पंडित ( पोलीस उप निरीक्षक)
6 – सचिन राजपूत (गोपनीय विभाग कर्मचारी)