बुलढाणा (हॅलो बुलडाणा) जिल्ह्यातील 8 मंडळ क्षेत्रामध्ये 21 जुलै रोजी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे या मंडळ क्षेत्रामध्ये घरांचे आणि शेतजमिनीचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील 21 जुलै ला ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाले तुडूंब भरुन वाहु लागले. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेक कुटूंबांच्या घरांचे व घरातील सामानांचे नुकसान झाले आहे. तर शेतजमिनही खरडुन गेली आहे. लोणार येथे 171.8 मि.मि., टिटवी येथे 154.5 मि.मि., हिरडव येथे 184.5 मि.मि., शेगांव तालुक्यातील जवळा 177.3 मि.मि., खामगांव तालुक्यातील पळशी येथे 151 मि.मि. पावसाची नोंद 21 जुलै च्या मध्यरात्री झाली आहे. त्यामुळे या मंडळ क्षेत्रामध्ये शेतजमिनीचे आणि घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतजमिनीचे कृषी विभाग, महसुल विभाग आणि पिक विमा कंपनीच्या प्रतिनीधी समवेत तात्काळ पंचनामे करण्यासंदर्भात आपल्या स्तरावरुन संबधित विभागांना निर्देशित कराव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आल्या आहे.