डोणगाव (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) पावसाने कहर केल्यामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले असून प्रशासनाला अद्यापही घडलेल्या घटनांची माहिती झालेली नाही, परंतु ‘हॅलो बुलढाणा’ सातत्याने माहिती मिळवत असते. गॅस सिलिंडर वाहून नेणारा ट्रकचालक पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
डोणगाव परिसरात 23 जुलै च्या रात्री अतिवृष्टी झाली रात्री 2 वाजता पासून कांचन नदीला पूर आल्याने वाहतूक बंद होती. शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मेहकर कडून मालेगाव कडे जाणारा एक गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक पिंप्री सरहद ता. रिसोड येथील उतावळी नदी मधे वाहला असता त्या ट्रक मधील चालकाचा मृत्यू झालेला असून तो चिखलठाणा संभाजी नगरचा रहवासी असून शेख हुसेन शे गुलाब असे त्याचे नाव आहे.