बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतरही दिव्यांग दुर्लक्षित,वंचित घटक आहेत. अनेक दिव्यांगांना योग्य ती मदत मिळत नाही. अशा अवस्थेत त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी सर्वांनीच चांगल्या व समर्पित भावनेने काम केले पाहिजे असे मत आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी व्यक्त केले.परंतु उदासीन धोरणामुळे सरकारच्या मनात नसतांना, बच्चू कडू यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून दिव्यांगांना अखेर न्याय दिला.
21 जुलै रोजी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना मोताळा यांच्यावतीने दिव्यांगाना अनुदानामध्ये वाढ झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करत लाडू वाटून दिव्यांगाचे तोंड गोड केले.
दिव्यांगाना 1500 वरून अनुदानामध्ये 1000 अनुदानामध्ये एकूण 2500 वाढ झाली बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाला यश मिळाले या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग संघटना मोताळा जिल्हाउपध्यक्ष राजेश पुरी व सुरेश जवंजाळ जिल्ह्या सघंटक शिवदास काडेलकर तालुका अध्यक्ष भगवाण लेनेकर , सगीत काडेलकर ,मिना पुरी,निना पाटील ,गजानन सुरडकर,शमशेर खा पठाण , जमु भाई,शिवराज पुरी मिना पुरी, क्रीशष्ष्णा भाऊ,आदी दिव्यांग बाधंव कार्यक्रमास उपस्थितीत होते.