किनगाव राजा (हॅलो बुलडाणा) अवैध देशी- विदेशी दारूचा महापूर जिल्ह्यात उसळत असून, राज्य उत्पादन शुल्क म्हणा की पोलिसांच्या कारवाई वरून हे स्पष्ट होत आहे. किनगाव राजा येथे एलसीबी पथकाने कारवाई करत 6 देशी दारूचे 22,400 रुपये किमतीचे बॉक्स ताब्यात घेऊन एका आरोपीला अटक केली आहे. दुसरबीड बसस्थानकावर ही कारवाई करण्यात आली.दारुत कुणाचे ‘हात ओले?’ हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दारूमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहे,हे सर्वश्रूत असले तरी,बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्री दिवसागणिक वाढत आहे. काही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कर्तव्याला बगल देत,दारूत हात ओले करीत असल्याचा दावा केला जात आहे. सध्या दारूचे दर वाढले असून, अवैध दारू विक्रेते बक्कळ पैसा कमावण्याचा नाद करत आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अशा दारूमफिया विरुद्ध मोहीम सुरू केली.त्यांच्या आदेशावरून व एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात एलसीबी पथकाने कारवाई करत 6 देशी दारूचे 22,400 रुपये किमतीचे बॉक्स ताब्यात घेऊन एका आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई एएसआय ओमप्रकाश सावळे,एचसी दिगंबर कपाटे, पीसी दीपक वायाळ, एलएचसी वनिता शिंगणे,चालक पीसी निवृत्ती पूंड यांनी केली.