spot_img
spot_img

💥EXCLUSIVE ‘अब हम बोलेंगे,तुम्हारे बाप को सुनना पडेगा!’ – माजी खासदार इम्तियाज जलील यांनी डागली तोफ!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) ‘जगह आपकी..वक्त आपका..बताईये कहाँ आना है?’ असे आम.संजय गायकवाडांना चॅलेंज केल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शहरात दाखल होत सत्ताधाऱ्यांवर टीका करीत ललकार दिली. आम्ही सत्तेत आहे, आम्ही काहीही बोलू.. या अविर्भावात आमदार गायकवाड यांच्या सारखे अनेक नेते आहे. यांचे आतापर्यंत खूप ऐकले,आता यापुढे ऐकून घेणार नाही,’अब हम बोलेंगे, तुम्हारे बाप को सुनना पडेगा!’… असा सणसणीत इशारा माजी खासदार जलील यांनी दिला.

बुलढाणा शहरातील इक्बाल चौकात आज 20 जुलै रोजी ऑल इंडिया मजलिस -ए इतेहादूल मुस्लिमीनच्या वतीने सत्कार सभा व पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी माजी खासदार इम्तिहाज जलील बोलत होते.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. ‘मी त्या वेटरच्या जागी असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती, असे जलील यांनी म्हटले होते. त्यानंतर जलील यांच्या या वक्तव्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले होते.
‘तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा, या वेटरला तर दोनच घुसे मारले आहेत, तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही, असे आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांना म्हटले होते. दरम्यान इम्तियाज जलील यांनी पुन्हा याचे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ‘मला धमकाविण्याची भाषा करताहेत.. आमदार गायकवाड साहेब.. जागा तुमची, वेळ तूमची .. सांगा कुठे यायचे आहे? मला तुमच्याशी काही घेणे देणे नाही.परंतू तुम्ही काही चुकीची हरकत करत असाल आणि त्या गरीबासाठी आवाज उठविणारा कोणी नसेल अन् आपले मुख्यमंत्री हसत हसत या प्रकरणा वर उत्तर देत असतील तर अशा गरीबासाठी मी जरूर उभा राहील!’ दरम्यान आज इम्तियाज जलील शहरात दाखल झाले असता त्यांनी हजारो संख्येत उपस्थित असलेल्या आयोजित सभेत सत्ताधाऱ्यांवर जहाल टीका केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!