डोणगाव (हॅलो बुलडाणा/ अनिल राठोड) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिप व पंस निवडणूक प्रक्रियेत पूर्नररचना केली आहे.मात्र मेहकर तहसील अंतर्गत येणाऱ्या विठ्ठलवाडी, उधवा या ग्रामपंचायतने पूर्नरचनेवर हरकत घेऊन सदर गावाचा समावेश डोणगाव सर्कल मध्ये न करता, देऊळगाव साखरर्शा सर्कलमध्ये करण्यात येण्याची मागणी केली आहे.
ग्रामपंचायत विठ्ठलवाडीची 18 जुलै रोजी सरपंच धनराज राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.बैठकीत सचिव यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसर्कलच्या पुनर्रचनेची माहिती दिली. सदर पूर्णरचनेनुसार विठ्ठलवाडी गावाचा समावेश हा पूर्वी घाटबोरी सर्कलमध्ये होता.परंतु अलीकडील बदलानंतर या गावाचा समावेश डोणगाव सर्कलमध्ये करण्यात आला आहे.विठ्ठलवाडी गावाचा भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टिकोनातून देऊळगाव साखरशा या गावाशी जवळचा व सुसंगत संबंध आहे.त्यामुळे विठ्ठलवाडी गावाचा देऊळगाव साखरशा सर्कल मध्ये समावेश करण्यात यावा, अशी हरकत तहसील कार्यालय मेहकर येथे नोंदविण्यात आली आहे. याबाबतचा ठराव 18 जुलैला ग्रामपंचायतमध्ये पारित करण्यात आला.