spot_img
spot_img

जिल्ह्यात जनावरे खरेदी विक्रीवर मुस्लिम खाटीक बांधवांचा बहिष्कार! – शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मुस्लिम कुरेशी खाटीक बांधवांनी जनावरांच्या कायदेशीर व्यापारात होणा-या ञासाला कंटाळून जनावरे खरेदी विक्री करण्यास राज्यात बेमुदत बंदीची घोषणा केली आहे.टप्प्या टप्प्यात याची अंमलबजावणी होत असून बुलढाणा जिल्ह्यात देखील मुस्लिम खाटीक बांधव एकवटले आहे.20 जुलै पासून जिल्ह्यात बाजारातून जनावरांची खरेदी-विक्री करणार नाही अशी घोषणा 19 जुलैच्या रात्री बुलडाणा येथील जोहर नगर येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला आहे.या निर्णयामुळे शेतकरी बांधवांच्या अडचणी निश्चित वाढणार आहे.

हाफिज रहेमत कुरेशी,माजी नगरसेवक जाकिर कुरेशी,माजी नप उपाध्यक्ष,सै.जुनेद डोंगरे,माजी नगरसेवक युनूस कुरेशी,माजी नगरसेवक मो.सज्जाद,बबलू कुरेशी,डॉ. मोबीन खान,शेख जावेद यांच्यासह इतर समाज बांधव या बैठकीत उपस्थित होते.मुस्लिम खाटीक बांधव मोठ्या प्रमाणात जनावरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात.अधिकृत बाजारातून ते शेतकरी व इतर व्यापाऱ्यांकडून मोठी जनावरे खरेदी करतात आणि हीच जनावरे गाडीत टाकून निघतात तेव्हा गौरक्षेच्या नावाखाली बजरंग दल व इतर हिंदुत्ववादी संघटनांचे तथाकथित कार्यकर्ते गाडी अडवून चालक,क्लिनर व व्यापाऱ्यांना अमानुषपणे मारहाण करतात व जनावरे खरेदीचे कागदपत्रे असतांना देखील पोलीस त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करतात.अश्या घटना वाढत असतांना हा अन्याय का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित करत मुस्लिम खाटीक बांधवानी जनावरे खरेदी विक्रीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला असून 20 जुलै पासून बुलढाणा जिल्ह्यात देखील या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन भविष्यात शेतकरी बांधवांची अडचण समजून योग्य ते निर्णय घ्यावा अशी मागणी देखील मुस्लिम खाटीक बांधवांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!