बुलढाणा (हॅलो बुलढाणा) लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तारांकित प्रश्न उपस्थित करूनही जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारी अद्यापही मोकाटच आहेत. याप्रकरणी एका छोट्या माशाला निलंबित करण्यात आले परंतु मोठे मासे अजूनही जाळ्यात आले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी कोणकोणत्या आरोग्य अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले ? या भ्रष्टाचारा मागे पारदर्शी चौकशीचा ससेमीरा का लागत नाही? भ्रष्टाचार करणाऱ्यांचा ‘रामबाण इलाज’ होईल का? अशा अनेक प्रश्नांकडे जिल्हावासियांचेच नव्हे तर तमाम राज्याचे लक्ष लागून आहे.
एकीकडे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचाराची भीक मागतानाचे चित्र दिसून येते. तर दुसरीकडे गलेलट्टपगार लाठणारे डॉक्टर,अधिकारी, कर्मचारी भ्रष्टाचार करण्यास कारणीभूत ठरतात. या भ्रष्टाचार प्रकरणी आवाज देखील उठविल्या जातो. परंतु मध्येच कशी मुस्कटदाबी होते हे कळायला मार्ग नाही.सत्तेत असलेले बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी दोन वेळा झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी लावली. सिंदखेड राजा येथील आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी ही लक्षवेधी लावली.पुणे विधान परिषदेतूनही याकडे लक्ष वेधले. पण पाहिजे तशी कारवाई झाली नाही. या करोडो रुपये भ्रष्टाचार प्रकरणात बुलडाणा येथील बहुचर्चित भांडारपाल प्रकाश नामदेव बोथे हा एकच कर्मचारी निलंबित करण्यात आला या सर्व साखळीतले दोषी अजूनही समाजात उजळ माथ्याने फिरत आहे. त्यांनी केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारातून कमावलेली करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती या दोषीकडून व्याजासह शासन तिजोरीत जमा व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.परंतु या मागणीचा आवाज कुणालाच कसा ऐकू येत नाही? याचेही आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
सत्तेतील लोकप्रतिनिधींनी तारांकित प्रश्न लावून धरल्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी या प्रकरणाकडे का दुर्लक्ष करीत आहे. हे सुज्ञ नागरिकांना कळतच आहे