spot_img
spot_img

सावित्रीच्या लेकीला एस टी महामंडळाची सावत्र वागणूक! – तळणी येथे थांबा असूनही वाहकाने विद्यार्थिनीला बसमधील प्रवेश नाकारला!

लोणार (हॅलो बुलडाणा) एसटी महामंडळ ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करत असल्याचा दावा करत असले, तरी प्रत्यक्षात काही चालक आणि वाहकांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना दिला जाणारा प्रवासाचा हक्क डावलला जातो आहे. सावित्रीच्या लेकीला बस मध्ये प्रवेश नाकारल्याचा प्रकार लोणार येथे समोर आलाय.. यामुळे विद्यार्थिनीसह पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

नागपूर ते परतुर बस ही लोणार येथून परतूरकडे तळणी मार्गे जाणारी एसटी बस (लालपरी) दुपारी 4:45 वाजता सुटली. सुलतानपूर येथे शिक्षण घेणारी शीतल राऊत ही विद्यार्थिनी रोजच्या प्रमाणे बस पकडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभी होती. बस जवळ येताच तिने हात दाखविल्याने बस थांबली देखील. मात्र, जेव्हा तिने वाहकाकडे बसमध्ये प्रवेशासाठी विचारणा केली, तेव्हा “ही गाडी तळणी येथे थांबत नाही”, असे स्पष्ट शब्दात वाहकाने सांगून तिला नकार देण्यात आला. दरम्यान शीतलने लगेच लोणार आगार व्यवस्थापकाशी संपर्क साधून वाहतूक नियंत्रकांशी बोलणी केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बस अधिकृतपणे थांबते. ही बाब आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित असताना घडली. बस मध्ये जागा असतानाही कंडक्टर ने विद्यार्थिनीला बसमध्ये प्रवेश नाकारला. हा प्रकार एसटी महामंडळाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. एसटी महामंडळाला तोटा होत असताना देखील, प्रवाशांना बस मध्ये न घेण्याचा कारभार चालू राहिला तर या संस्थेच्या सक्षमीकरणाबाबत मोठे प्रश्न निर्माण होतात. संबंधित चालक व वाहकावर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.अशी आता मागणी केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!